होंडाची सुपरबाईक अफ्रिका ट्विन जुलैत येणार


जपानी दुचाकीवाहन कंपनी होंडाने त्यांची नवी ऑफरोडर सुपर बाईक अफ्रिका ट्विन भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. या बाईकची असेंब्ली मानेसर येथील उत्पादन प्रकल्पात केली जाणार आहे. गतवर्षी भारतात झालेल्या ऑटो शोमध्ये ही बाईक सादर केली होती व त्यावेळी तिला मोठा प्रतिसाद मिळाला होता असे समजते.

या बाईकची अधिकृत किंमत जाहीर झाली नसली तरी तिची किंमत १३ लाख ८० हजार रूपये असेल असे सांगितले जात आहे. स्पेसिफिकेशन संदर्भातली माहिती अशी- या बाईकला ९९८ सीसी लिक्वीड कूल इंजिन, डीटीसी आधारित सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम अशी फिचर्स आहेत व तिचे डिझाईन खास करून ऑफरोडींगसाठी केले गेले आहे. ऑफरोड बाईकचा वापर भारतात म्हणावा तसा रूळलेला नाही तरीही भारतात ही बाईक लाँच झाली तर या क्षेत्रात स्पर्धा वाढेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

ही बाईक भारतात गेल्या वर्षीच लाँच केली जाणार होती मात्र कंपनीच्या जपानमधील प्रकल्पाला भूकंपाची झळ बसल्याने ते लांबल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment