चीनी स्मार्टफोन कंपनी प्रोट्रूली ने ३६० डिग्री अँगलने फोटो आणि व्हिडीओ काढू शकणारा व्हीआर कॅमेरा सपोर्ट करणारा स्मार्टफोन सादर केला असून स्मार्टफोनला असे फिचर प्रथमच दिले गेले आहे. कंपनीने या फोनची दोन व्हर्जन सादर केली आहेत. डार्लिंग डी सेव्हन व डार्लिंग डी एट या नावाने ही व्हर्जन सध्या फक्त चीनी बाजारात उपलब्ध करून दिली गेली आहेत.
३६० डिग्रीतून फोटो काढणारा डार्लिंग डी स्मार्टफोन
या स्मार्टफोनमध्ये चार हिरे जडविले गेले आहेत तसेच रियर कॅमेरा मॉड्यूलवर गोल्डन स्ट्रीप्स व लेदर पॅडींग आहे. दोन्ही फोनसाठी मेटल बॉडी दिली गेली आहे व दोन्हीची फिचर्स जवळजवळ सारखीच आहेत. डी सेव्हनची किंमत ४८ हजार तर डी एटची किंमत ८५ हजार रूपयांच्या दरम्यान आहे. या फोनच्या रेग्युलर रियर व फ्रंट कॅमेरासोबत दोन सेन्सर आहेत.१३ एमपी दोन सेन्सरमुळे एकसाथ ते २६ एमपीचे होतात व त्यामुळे ३६० अंशातून फोटो व फोर के चा व्हिडीओ शूट करता येतो.
या फोन्ससाठी ५.५ इंची सुपर अमोलेड फुल एचडी स्क्रीन, मिडीया टेक हेलियो एक्स २० डेकाकोर १३ एमपीचा रियर व ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, ३५६० एमएएच बॅटरी दिली गेली आहे. डी ७ साठी ३ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरी तर डी ८ साठी ४ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल मेमरी आहे.