फॉर्च्युन ने यंदा जाहीर केलेल्या टॉप ५० जागतिक प्रमुखांमध्ये एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्य यांची निवड झाली असून या यादीत त्या २६ व्या नंबरवर आहेत. कार्पोरेट जगतातील टॉप नेतृत्त्वात भारताच्या अरूंधती रॉय या एकट्याच महिला आहेत. शुक्रवारी ही घोषणा केली गेली. बॅकेच्या हिताचे निर्णय घेताना त्यांना सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी, सरकार यांना नाराज करण्याची पाळी आली मात्र तरीही त्यांनी कठोर पावले उचलली जावीत अशीच शिफारस केली.
फॉर्च्युन टॉप ५० मध्ये एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्य
सार्वजनिक क्षेत्रातील भारताची सर्वात मोठी बँक एसबीआयचे नेतृत्त्व करणार्याही अरूंधती या पहिल्याच महिला आहेत. आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या संस्थेचे प्रभावी नेतृत्त्व करणार्यांचा या यादीत समावेश केला जातो. भट्टाचार्य यांनी बँकेच्या बुडीत कर्जाला विरोध करण्याची योजना पुढे नेऊन त्यांचे खंबीर नेतृत्त्व सिद्ध केले आहेच त्याचबरेाबर त्यांच्या कारभारातच बँकेने सहा बँकांचे विलीनीकरणही करून घेतले आहे. २११ वर्षे वयाच्या या बँकेला डिजिटल युगात नेण्याची कामगिरीही त्यांनी बजावली आहे. त्यांचा तीन वर्षांच्या कार्यकाल संपल्यानंतरही त्यांना मुदतवाढ दिली गेली आहे.