हवेत तयार होत आहे बटाट्याचे सुधारित बियाणे


बटाट्याच्या सध्याच्या उत्पादनापेक्षा 150 पट अधिक बियाणे निर्माण करता येईल, असे बियाणे तयार करण्याचा प्रयत्न पंजाबमधील कृषितज्ज्ञ करत आहेत. विशेष म्हणजे हे बियाणे माती न वापरता निव्वळ हवेत तयार करण्यात येईल.

धोगडी येथील ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर पोटॅटो’ येथील शास्त्रज्ञ हे संशोधन करत आहेत. सीईपीआयने शोधलेल्या एरोपॉनिक तंत्रज्ञानामुळे बटाट्याच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती येईल. या तंत्रज्ञानामुळे एकाच रोपट्यातून चार वर्षांमध्ये 64 हजार 500 टयुवर तयार होतील. सध्या ही संख्या 2250 एवढी आहे. ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर पोटॅटो’चे प्रकल्प अधिकारी डॉ. परमजीत सिंह यांच्या देखरेखीखाली एरोपॉनिक तंत्राने बटाट्याचे बियाणे तयार करण्याची योजना चालू आहे, असे पंजाब उद्यानविद्या विभागाचे उपसंचालक डॉ. सतवीर सिंह यांनी ही माहिती दिली.

पुढच्या दोन वर्षांमध्ये हे बियाणे शेतकऱ्यांना मिळेल.

अशा प्रकारे तयार केलेले मिनी टयुवर उत्पादनानुसार जी-वन, जी-टू व जी-थ्री स्टेजमधील बियाणे शेतकऱ्यांना विकण्यात येतील. यह बीज अगले दो वर्षों में किसानों के लिए उपलब्ध हो जाएगा। उन्होंने बताया कि आलू फसल की बिजाई से लेकर खुदाई तक ज्यादा से ज्यादा मशीनीकरण के इस्तेमाल को प्रोत्साहित त्यातून शेतकरी स्वतःसाठी दर्जेदार बीज बनवू शकतील, असे सिंह यांनी सांगितले.

Leave a Comment