डिजिटल लॉकर सेवापुरवठादार बनण्याची संधी


मोदी सरकारकडून देशभरात डिजिटल लॉकर सेवा पुरवठादार साठी अर्ज मागिविले गेले असून त्यामुळे इच्छुकांना मोदी सरकारच्या सहकार्याने व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे दर महिना चांगली कमाई होऊ शकणार असून ही सेवा देणारे ऑनलाईन डिजिटल सेवा देऊ शकणार आहेत.

या सेवेमुळे सरकार, खासगी कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे व्यक्ती ऑनलाईनवर लॉकरमध्ये जमा करू शकतील. यात बँक अकौंटपासून ते सरकार व खासगी कंपन्यांशी संबंधित सेवा घेण्यासाठी कुणाही व्यक्तीला फिजिकल फॉर्ममध्ये कागदपत्रे ठेवण्याची गरज नाही. डिजिटल लॉकर सेवा पुरवठादार हे काम करेल. अर्थात सेवा पुरवठादार साठी अर्ज करताना प्रोपायटर फर्म अथवा कंपनी नसली तरी अशा संस्थांबरोबर भागीदारी करून सेवा पुरवठादार बनता येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी एक फॉर्म भरून त्यासोबत २ लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट अथवा क्रॉस चेक डिजिटल अॅथॉरिटीकडे जमा करायचा आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर निवडलेल्यांना सहा वर्षासाठी परवाना दिला जाईल मात्र तो रिन्यू करावा लागेल. अन्य अटी संबंधित वेबसाईटवर दिल्या गेल्या आहेत.

Leave a Comment