अमेरिकेची प्रतिष्ठित ऑटो मेकर कंपनी जीप च्या नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची भारतात प्रतीक्षा केली जात असून कंपास नावाची ही एसयूव्ही भारतात उत्पादित केली जाणारी कंपनीची पहिली एसयूव्ही असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिएट क्राईसलर ऑटोमोबाईल तर्फे १२ एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन या एसयूव्ही संदर्भातली घोषणा केली जाणार आहे. या एसयूव्हीचे भारताशिवाय चीन, ब्राझील, मेक्सिको, मध्येही उत्पादन केले जाणार असल्याचे समजते. कंपनीने जगभरातील १०० देशांत या गाडीचे विक्रीची योजना आखली आहे.
भारतात तयार होणार जीपची नवी एसयूव्ही कंपास
भारतात ही एसयूव्ही राईड हँड ड्राईव्ह मोठमध्ये असेल तर बाकी देशात ती लेफ्ट हँड ड्राईव्ह मोड मध्ये मिळेल. ही कार जूनपर्यंत लाँच केली जाईल. या एसयूव्हीचे इंटरनॅशनल मॉडेल गत वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केले गेले आहे. भारतात ही कार १.४ लिटर पेट्रोल व २.० डिझेल इंजिन अशा दोन व्हर्जनमध्ये येईल. त्याला सहा स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स तसेच ९ स्पीड अॅटोमेटिक ट्रान्समिशनचा पर्यायही दिला जाणार आहे. एलईडी हेड व टेल लँप, इन्स्ट्रूमेंट क्लस्टरवर ३.५/७ इंची एलईडी इन्फोर्मेशन डिस्प्ले, ८ इंची टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, तसेच ७० पेक्षा अधिक अॅक्टीव्ह व पॅसिव्ह सेफ्टी फिचर्सही दिले जाणार आहेत. भारतात या एसयूव्हीची किंमत १८ ते२० लाख रूपयांदरम्यान असेल.