शाओमीचे दुसरे उत्पादन केंद्र भारतात सुरू


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने फॉक्सकॉनसह भागीदारी करून भारतात दुसरे उत्पादन केंद्र आंध्रप्रदेशात सुरू केले आहे. जुलै २०१४ मध्ये कंपनीने त्यांचे पहिले उत्पादन केंद्र भारतात सुरू केले होते. नव्या उत्पादन केंद्रात मिनिटाला १ स्मार्टफोन तयार केला जाणार आहे. तर फॉक्सकॉन अन्य व्हेंडर्सच्या सहकार्याने जुन्या मॉडेल्सचे उत्पादन करणार आहे. या केंद्रांमुळे भारतात किमान ५ हजार जणांना रोजगार मिळाला असून त्यात ९० टक्के महिला आहेत.

शाओमी इंडियाचे प्रमुख मनु जैन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आमचे नवे युनिट शाओमी युजर्ससाठी खास ठरणार आहे. या उत्पादन केंद्रामुळे शाओमी युजर्सची ९५ टक्के मागणी पूर्ण करू शकेल. मात्र अ्रॅक्सेसरीज, इको सिस्टीम प्रॉडक्ट, प्रिमियम प्रॉडक्ट चीनमधूनच आयात केले जाणार आहेत. भारतीय बाजारात शाओमीने १०.७ टक्के हिस्सा मिळविला आहे. कंपनीचा रेडी मी ४ स्मार्टफोन भारतातील उत्पादन केंद्रातच बनविले जाणार असून या फोनची किंमत आहे ५९९९ रूपये.

Leave a Comment