आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरुनही फेसबूक लाईव्ह शक्य


न्यूयॉर्क – आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरुनही फेसबुक लाईव्ह करणे शक्य होणार असून तुमच्या कॉम्प्यूटरमध्ये यासाठी वेबकॅम असणे गरजेचे असणार आहे. फेसबूकवरुन लाईव्ह करण्याची सुविधा आतापर्यंत फक्त मोबाईलमध्येच उपलब्ध होती. हा ऑप्शन त्यामुळे अनेकांनी डेस्कटॉप आणि लॅपटॉपमध्येही असावा अशी मागणी केली होती. त्यानंतर अखेर फेसबूकने हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

सुरुवातीला डेस्कटॉपवरुन लाईव्ह करण्याची सुविधा फक्त पेजेसमध्ये उपलब्ध होती, पण आता कोणत्याही डेस्कटॉपवरुन लाईव्ह केले जाऊ शकते अशी माहिती फेसबूकने आपल्या ब्लॉगवरुन दिली आहे. यासाठी स्टेटस अपडेट कंपोजरमधील लाईव्ह ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे. फेसबूकने याशिवाय अजून एक फिचर आणले आहे. यामध्ये स्ट्रिमिंग सॉफ्टवेअर किंवा इतर एक्सटर्नल सॉफ्टवेअरच्या मदतीने लाईव्ह करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

Leave a Comment