ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटने गेल्या सहा महिन्यात दहशतवादाला प्रोत्साहन देणारी ३ लाख ७० हजार अकौंट सस्पेंड केली असून गेल्या अठरा महिन्यात कंपनीने अशी ६ लाखांहून अधिक अकौंट सस्पेंड केली आहेत असे जाहीर केले गेले आहे. ही अकौंट सस्पेंड करताना कंपनीने सदर अकौंट ओळखण्यासाठी स्वतःच्या टूल्सची मदत घेतल्याचेही सांगितले जात आहे.
ट्विटरकडून दहशतवाद पोसणारी साडेतीन लाख अकौंट सस्पेंड
आकडेवारीनुसार २०१६ च्या शेवटच्या सहामाहीत ३,७६,८९० अकौंट सस्पेंड केली आहेत. तर १ ऑगस्ट २०१५ पासून आत्तापर्यंत ६,३६,२४८ अकौंट सस्पेंड केली आहेत. यासाठी कंपनीने पिपल्स अगेन्स्ट व्हायोलंट एक्सट्रीमिस्ट, ल्यूमन प्रोजेक्ट या गटांचीही मदत घेतली. अतिरेकी संघटना ट्विटरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करत होत्या व या ब्लॉगिंग साईटवरून अतिरेकी राष्ट्रीयवाद, वर्णद्वेष अथवा धार्मिक आवाहने केली जात होती. कंपनीने यापुढेही दहशतवादाशी मुकाबल्याचा प्रयत्न म्हणून तसेच पारदर्शकता पाळण्यासाठी अपडेट शेअर करत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.