जिओनीने त्यांचा सेल्फी सेंट्रीक स्मार्टफोन ए वन भारतात सादर केला असून त्याच्या प्री ऑर्डर ३१ मार्चपासून घेतल्या जाणार आहेत. ऑफलाईन रिटेलर्सकडे त्यासाठी नोंदणी करता येईल मात्र हा फोन अमेझॉन इंडिया कडूनच विकला जाणार आहे. मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये कंपनीने हा फोन सादर केला होता.
जिओनीचा सेल्फीसेंट्रीक ए वन भारतात सादर
या फोनसाठी ५.५ इंची डिस्ले, मिडीया टेक हेलिओ पी १० प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज व ते २५६ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डने वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. अँड्रईड नगेट ७.० ओएस असलेल्या या फोनला रियर कॅमेरा १३ एमपीचा तर फ्रंट कॅमेरा १६ एमपीचा दिला गेला आहे. फोनच्या बॅटरीची क्षमता ४०१० एमएएच आहे. फोनची किंमत जाहीर केली गेलेली नाही मात्र ती साधारण २४,६०० रूयपांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.