अवघ्या काही सेकंदात शाओमीचा स्मार्टफोन सेल आउट


नवी दिल्ली – गुरुवारी शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या रेड्मी ४ ए या मोबाइलच्या पहिल्या विक्रीला सुरुवात होताच काही सेकंदांमध्येच या व्हर्जनचे सगळे मोबाइल विकले गेले. अॅमेझॉन इंडिया आणि मी डॉट कॉमवर आज दुपारी १२ वाजता या मोबाइलची विक्री सुरू झाली त्यानंतर काही वेळातच सगळे मोबाइल विकले गेले.

५ हजार ९९९ रुपये इतकी शाओमीच्या या मोबाइलची किंमतअसून, डार्क ग्रे आणि गोल्ड कलर्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. आजच्या विक्रीला बंपर प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या मोबाइलची पुढील विक्री ३० मार्च रोजी होणार आहे. आजच्या उद्धाटनाच्या विक्रीसाठी अॅमेझॉन इंडियाने दहा टक्के कॅशबॅकची ऑफर देखील ठेवली होती. ही ऑफर अॅमेझॉनची वेबसाइट, मोबाइल साइट आणि अॅपवरून इंडसइंड बँकेच्या क्रेडिट वा डेबिट कार्डमधून पेमेंट करण्यावर देण्यात आली होती.

Leave a Comment