आयफोन ७ने टाकली कात


नवी दिल्लीः आयफोन ७ सीरीजचा नव्या रंगातील ‘प्रॉडक्ट रेड’ स्पेशल एडिशन अ‍ॅपल या जगप्रसिद्ध मोबाईल कंपनीने लॉन्च केले आहे. लाल रंगांच्या रिअर बॉडीसोबत हे नवे एडिशन येणार आहे. यासोबतच कंपनीने त्यांच्या जुन्या आयफोन्ससाठी लाल रंगांची केस आणली आहे. आयफोनने पहिल्यांदाच आपला ट्रेडिशनल कलर सोडून लाल रंग आणला आहे. कंपनीने आयफोन ७ लाँच करताना जेट ब्लॅक व्हेरिएंट आणला होता.

आयफोन ७ आणि ७प्लस लाल रंगातील १२८ जीबी आणि २५६ जीबी मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. अॅपलच्या वेबसाईटवर हा डिव्हाईस ७४९ डॉलर एवढ्या किंमतीला उपलब्ध आहे. या नव्याची स्मार्टफोन विक्री अमेरिकेसह ४० देशात २४ मार्चपासून सुरु होईल.

अॅपलचे सीईओ टीम कूक या नव्या आयफोनबद्दल म्हणाले की, हे आमचे आणि रेडच्या भागीदारीतील सर्वात मोठे प्रोडक्ट आहे. आयफोन ७ मध्ये ४.७ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन १३३४ x ७५० आहे. नव्या आयफोन जनरेशनसोबत अॅपलने नव्या प्रोसेसर चिप ए१० फ्यूजनचा वापर केला आहे. अॅपलचा दावा आहे की, ए१० फ्यूजन आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रोसेसर आहे. यामध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे. तर १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे.

Leave a Comment