मुंबई मेट्रो भाडे कलेक्शन सिस्टीमसाठी १२ कंपन्यांकडून बोली


मुंबईच्या कोलाबा बांद्रे मेट्रो च्या अॅटोमॅटिक फेयर कलेक्शन सिस्टीमसाठी एल अॅन्ड टी, गोदरेज, झेरॉक्स, डेटामॅटिक्स सह १२ कंपन्यांनी बोली लावली असून त्याच्या निविदा लवकरच मागविल्या जात आहेत. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने या निविदा मागविल्या असून या सिस्टीममुळे भाडे व्यवस्थापन व कलेक्शन मशीन्स द्वारे होईल व त्यात मानवी हस्तक्षेप करता येणार नाही. यामुळे तिकीट घेतल्याशिवाय प्रवासी मेट्रो मध्ये चढू शकणार नाही. निविदा भरणार्‍या कंपन्यात सहा जॉईंट व्हेंचर्स आहेत तर अन्य कंपन्यात चिनी सियासुन रोबो, स्पेनची इंद्रा सिसटेमास, थेल्स कम्युनिकेशन अॅन्ड सिक्युरिटी, झेरॉक्स बिझिनेस सोल्युशन्स, सिगापूर टेक्नॉलॉची व जपान च्या निप्पोन यांचा समावेश आहे.

मुंबईतील कोलाबा बांद्रे या ३३.५ किमी लांबीच्या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गासाठी २१.१३६ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून त्यात वाढ होऊ शकते. या मार्गाचे काम सुरू झाले आहे व त्यावर २७ स्टेशन्स असतील. त्यातील २६ अंडरग्राऊंड आहेत. हा मार्ग दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. संपूर्ण मार्ग २०२१ च्या मार्चपर्यंत पूर्ण केला जाणार आहे असे समजते.

Leave a Comment