अँड्राईड ओ चे लवकरच आगमन


गुगलने त्यांच्या अँड्राईड एन नगेट नंतर आता पुढचे रिलीज अँड्राईड ओ लवकरच सादर केले जात असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचे नांव काय असेल याबाबत अजून खुलासा केला गेलेला नाही. साधारणपणे गोड पदार्थांवरून ही नांवे ठरविली जातात. उदाहरणार्थ लॉलीपॉप, मार्शमेलो, नगेट इत्यादी. येत्या मे महिन्यात त्याचा प्रिव्ह्यू येईल असेही कळते.

नाईन टू फाईव्ह गुगल वर दिल्या गेलेल्या माहितीनुसार अँड्राईड ओ नवीन फिचर्ससह असणार आहे. त्यात सुधारित नोटिफिकेशनसाठीची नवी सिस्टीम अँड्रोमेटा नावाने असेल असेही समजते. स्मार्ट ऑडरिंग बरोबर नवीन अॅप आयकॉन बॅजेस नोटिफिकेशनसाठी वापरले जातील. यात युजरला किवक ग्लान्स मध्ये कोणत्याही अॅपसाठी किती नोटिफिकेशन्स आहेत हे कळेल. म्हणजे होम स्क्रीनवरच ते कळू शकणार आहे. त्यात अँड्राईड टिव्ही प्रमाणे पिक्चर इन पिक्चर मोड असेल तसेच गुगल असिस्टंटही असेल. तसेच क्रोम ५७ सारख्या बॅकराऊंड अॅक्टीव्हीटीवर बंधने असतील यामुळे पॉवर कमी वापरली जाईल व त्याचा फायदा बॅटरी लाईफ वाढण्यात होईल असेही समजते.

Leave a Comment