टाटा टिगोरचे ५ हजार रूपयांत प्रीबुकींग सुरू


टाटाने त्यांच्या देशभरातील अधिकृत वितरकांकडे भारतातील पहिली स्टाईलबॅक कार टिगोर साठी प्रीबुकींग सुरु केले असून केवळ ५ हजार रूपये भरून ही अत्याधुनिक व युवा आयकॉन कार बुक करण्याची सवलत दिली आहे. वेगाचे वेड असलेल्यांना व तरूणाईला ही शानदार, ब्रेक फ्री, क्रांतीकारी डिझाईनची कार नक्कीच आवडेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

टाटा प्रवासी कार विभागाचे प्रमुख मयंक पारिख म्हणाले टिगोरचे इम्पॅक्ट डिझाईन सर्वोत्तम ड्रायव्हिंग फिचर्स व अॅडव्हान्स इफोटेनमेंट सिस्टीम म्हणजे टाटांच्या भविष्यातील कार्सची झलक आहे. या कारला स्मोक्ड लेन्ससह थ्री डायमेन्शनल हेडलँप्स, स्पोर्टी बॅक बेजल, शार्प टेल लँप्स दिले असून ती पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. तसेच इको व सिटी अशा मल्टी ड्राइव्ह मोडमध्ये ती मिळणार आहे. इको मोड इंधन बचत करेल तर सिटी मोड डिफॉल्ट होतानाच इंजिन आउटपूट चांगला देईल. शानदार ड्रायव्हींग अनुभवाबरेाबरच ही कार चालक व प्रवाशांना सुरक्षाही देणार आहे.