पुन्हा सुरु झाले व्हॉट्सअॅपचे जुने ‘स्टेटस’ फीचर !


मुंबई: आपले जुने स्टेटस फीचर व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा सुरु केले आहे. अनेक यूजर्सच्या पसंतीस नवे स्टेट्स फीचर उतरले नव्हते. त्यामुळे व्हॉट्सअॅपने जुने स्टेटस फीचर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता जुने स्टेटस फीचर रोल आऊट होणे सुरु झाले आहे.

आपल्या ८व्या वर्षपूर्तीनिमित्त व्हॉट्सअॅपने नवे स्टेटस फीचर सुरु केले होते. पण व्हॉट्सअॅपच्या अनेक यूजर्सने याबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे व्हॉट्सअॅपने देखील आपला निर्णय बदलला. अँड्रॉईड यूजर्संना अपडेट मिळणे सुरु झाले आहे. या फिचरला नाव मात्र अबाउट (About) देण्यात आले आहे. जुने फीचर व्ही२.१७.१०७ अपडेटसह वापरले जाऊ शकते.

यूजर्सला जुने स्टेट्स फीचर सुरु करण्यासाठी सेटिंग मेन्यू जावे लागेल. त्यानंतर प्रोफाइल फोटोच्या खाली तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल. त्यावर करुन यूर्जस स्टेटस बदलू अथवा एडिट करु शकतो. पूर्वीप्रमाणे तुम्हाला येथे Available, Busy, At school, At the movie असे ऑप्शन दिसतील. दरम्यान, जुन्या स्टेट्ससोबत तुम्हाला नवे स्टेट्स फीचरही सुरु ठेवता येईल. त्यामुळे यूजर्सला हवे असलेले फीचर तो निवडू शकतो.

Leave a Comment