स्टीफन हॉर्किंग्ज अंतराळप्रवासास जाणार


भौतिक शास्त्राचे प्रसिद्ध संशोधक स्टीफन हॉकिंग्ज यांनी अंतराळमोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. 75 वर्षीय हॉकिंग्ज पार्किसन्ससारख्या व्याधीने ग्रस्त आहेत व ते कोणतीही हालचाल स्वत: करू शकत नाहीत. अमेरिकेचे नेतृत्त्व डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे गेल्यामुळे ते निराश आहेत. मात्र तरीही व्हर्जिन गॅलेक्ट्रिक अंतराळयानातून प्रवासाचे अमेरिकन उद्योजक रिचर्ड ्रब्रेनसन यांनी दिलेले आमंत्रण स्टीफन यांनी स्वीकारले आहे. या बाबत ते म्हणतात, अमेरिकेत माझे स्वागत होणार नाही याची खात्री आहे. मला अंतराळ प्रवासासाठी कुणी निमंत्रण देईल अशी अपेक्षा नव्हती मात्र आता ही संधी मी सोडणार नाही.

स्टीफन यांचे बिग बँग थिअरीतील योगदान फारच मोठे आहे. अनेक बडे शोध त्यांच्या नावावर आहेत. डोनाल्ड ट्रंप यांचे वर्णन त्यांनी दुर्जनांचे नेते असे पूर्वीच केले आहे. त्यामुळे अमेरिकेत आपले स्वागत होणार नाही याची त्यांना खात्री आहे. तरीही तेथे जाऊन अन्य वैज्ञानिकांशी चर्चा करायला आवडेल असे ते म्हणाले. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी 2009 मध्ये स्टीफन यांचा प्रतिष्ठित फ्रँकलींड मेडल देऊन सन्मान केला होता.

Leave a Comment