बुलीट ग्रुपचा कॅट एस ५० स्मार्टफोन


ब्रिटीश कंपनी बुलीट ग्रुपने त्यांचा जगातला पहिला थर्मल कॅमेरा असलेला स्मार्टफोन कॅट एस ५० भारतात लाँच केला असून त्याची किंमत आहे ६४९९० रूपये. हा फोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. भारतात कंपनी वर्षाला किमान १० लाख स्मार्टफोन विकू शकेल असा विश्वास कंपनीच्या विपणन अधिकारी लिंडा समर्स यांनी व्यक्त केला आहे.

रियर फ्लिट लेप्टन थर्मल मायक्रोकॅमेरा मॉड्यूल केसचा वापर हे या फोनचे खास वैशिष्ठ आहे. या केसचा वापर अनेक प्रकारांनी करता येतो. पूर्ण अंधारातही या केसमुळे दिसू शकते. या फोनला ४.७ इंची डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची क्षमता, अँड्रईड मार्शमेलो ओएस, १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा याला दिला गेला आहे. रियर कॅमेरा अंडरवॉटरही वापरता येतो. त्याला ड्युअल एलईडी फ्लॅश दिला गेला आहे. हा फोरजी फोन असून एलटीई, वायफाय, ब्लू टूथ ४.१, मायक्रोयूसबीला सपोर्ट करतो. फोनची बॅटरी नॉनरिमुव्हेबल ३८०० एमएएचची आहे. तिच्यामुळे ३० तासांचा टॉकटाईम व ४३ दिवसांच्या स्टँडबाय टाईम मिळेल असेही कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment