सिंफनीने उन्हाळ्याच्या तोंडावर आणले हायटेक कूलर


एअर कूलर निर्माती कंपनी सिंफनीने मार्केटमध्ये उन्हाळ्याच्या तोंडावर कूलर्सची टच रेंज सादर केली असून या कूलर्सची फिचर्स वेगळी आहेत. एअर प्युरिफायर, मॉस्किटो रिपेलंट अशी उत्पादनेही कंपनीने सादर केली आहेत.

कूलरमध्ये टचस्क्रीन, व्हॉईस असिस्टंट व आयप्युअर फिचर्स दिली गेली आहेत. आयप्यूयर पीएम२ डॉट वॉश, फिल्टर, बॅक्टेरिया फिल्टर, अॅलर्जी फिल्टर, स्मेल, डस्ट फिल्टरमुळे हवा शुद्धही मिळते व थंडही मिळते. पाच कूलर्सची रेंज कंपनीने सादर केली आहे.२० ते ११० लिटर्स क्षमतेचे हे कूलर्स ६०० चौ.फुटाच्या जागेला थंड ठेवू शकतात.

सिंफनीचा भारताच्या एअरकूलर मार्केटमध्ये ५० टक्के हिस्सा असून कंपनीच्या नावावर १३ पेटंट, ११ कॉपीराईट, ३९ रजिस्टर्ड डिझाईन्स व १४० ट्रेडमार्क आहेत. कंपनीचे सरकारमान्य ग्लोबल आर अॅन्ड डी सेंटरही आहे. टचस्क्रीन व व्हॉईस असिस्टंटची सुविधा दिलेले कूलर्स वापरायला एकदम सोपे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment