शाओमीचा रेडमी ४ए लाँच


भारतात आपला नवा स्मार्टफोन रेडमी ४ए शाओमीने लाँच केला आहे. शाओमीच्या रेडमी ४ सीरिजमधील सर्वात बेसिक वेरिअंट हा स्मार्टफोन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये शाओमी रेडमी ४ आणि शाओमी रेडमी ४ प्राईमसोबत लाँच केला होता.

या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले असणार आहे ज्याचे रिझोल्यूशन ७२० x १२८० पिक्सल्स आहे. हा अँड्रॉईड फोन ६.० मार्शमैलोवर आधारित कंपनीच्या यूजर इंटरफेस एमआययुआय ८ वर चालतो. यामध्ये १.४GHz च्या क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन, ४२५ प्रोसेसरसोबत दोन जीबी रॅम उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनल मेमरी १६ जीबी असून १२८ जीबी पर्यंतच मायक्रोएसडी कार्डपर्यंत वाढवली जाऊ शकते. रेडमी ४ए मध्ये १३ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आहे. यामध्ये PDAF, ५ लेन्स सिस्टम, f/2.2 अपर्चर आणि एलईडी फ्लॅश आहे तर ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पॉलिकार्बोनेट बॉडी असणा-या रेडमी ४ए मध्ये ड्यूअल सीम कार्ड स्लॉट आहे. कनेक्टिव्हीटीबद्दल बोलायचे गेल्यास यामध्ये ४जी VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूट्यूथ आणि मायक्रो-यूएसबी सपोर्ट असणार आहे. यामध्ये ३१२०mAh बॅटरी असून लवकरात लवकर चार्जिंग करण्यास मदत मिळेल. शाओमी रेडमी ४ए ची किंमत ५९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉन वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. डार्क ग्रे आणि गोल्ड रंगात हा फोन उपलब्ध असेल.

Leave a Comment