नवी दिल्ली : आपल्या वाहनांच्या किमतीत जवळपास २ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय जर्मनची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्लू कंपनीने घेतला असून पुढील महिन्यांपासून या वाहनांच्या किमतीत करण्यात आलेली वाढ लागू करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना बीएमडब्लूचे अध्यक्ष विक्रम पावा यांनी सांगितले, आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये विशिष्ट ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांसाठी दर्जेदार प्रॉडक्ट लाँच करण्याचे सुरु आहे. कंपनीने बीएमडब्लू पोर्टफोलियोच्या किमतीत २ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.