प्लॅस्टीक नोट छपाईची रिझव्हॅ बँकेला परवानगी


देशात लवकरच येणार येणार अशी चर्चा असलेल्या प्लॅस्टीकच्या दहा रूपये मूल्याच्या नोटा आता खरोखरच येण्याचा मार्ग मोकळा झाला असून केंद्र सरकारने रिझव्हॅ बँकेला १० रूपयांच्या प्लॅस्टीक नोटा छपाईची परवानगी दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अजुर्न मेघवाल यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ते म्हणाले या नोटा सुरवातीला पाच ठिकाणी ट्रायल म्हणून वितरित केल्या जाणार आहेत.

प्लॅस्टीक नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक काळ टिकतात, रिसायकल करून त्यापासून अन्य उत्पादने बनविता येतात, या नोटा लवकर खराब होत नाहीत, त्यांच्यावर कमी प्रमाणात बॅक्टेरिया तगू शकतात अशी त्यांची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. आज जगभरातील ३० देशातून प्लॅस्टीक नोटा वापरात आहेत त्यात कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांचाही समावेश आहे. कागदी नोटा बनविताना लागणारा कच्चा माल म्हणजे कागदासाठी झाडे तोड, वीज, पाणी या सार्‍यांची बचत होते व त्यामुळे या नोटा पर्यावरण पूरक बनतात.

Leave a Comment