थायलंड- परदेशी पर्यटनाला चांगला पर्याय


उन्हाळ्याच्या सुट्या आता तोंडावर आल्या आहेत. पर्यटनासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर कुटुंबासह जाण्यासाठी थायलंड म्हणजे पूर्वीचा सयाम हा एक चांगला व तुलनेने स्वस्त पर्याय आहे. आजकाल भारतीयांचे सिंगापूर, होंगकाँग, मलेशिया या देशात जाण्याचे प्रमाण वाढत चालले असताना थायलंडला जाणार्‍या पर्यटकांची संख्याही लक्षणीय रित्या वाढली आहे.मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये सुमारे २० लाख पर्यटकांनी थायलंडची सैर केली आहे. सात दिवसांची सुटी थायलंड दर्शनासाठी पुरेशी ठरू शकते.

आधुनिकतेबरोबरच पारंपारिकता जपणारा हा देश पर्यटकांना भुरळ घालतो. राजधानी बँकॉकचे नाईट लाईफ हे पर्यटकांचे मोठेच आकर्षण असते त्याचबरोबर येथे आपल्या बजेटनुसार हॉटेल्स निवडीचीही संधी आहे. डायनोसोर प्लॅनेटची सफर बच्चे कंपनींसाठी खास म्हणावी अशी. येथे सर्व जातीच्या डायनोसोरच्या प्रतिकृती आहेत व त्यांच्याविषयी माहिती जाणून घेता येते.

थायलंडमध्ये मादाम तुसाद वॅक्स म्युझियम, ऑर्ट अॅन्ड पॅराडाईज, अक्सरा थिएटर, आशियाई नाईट बाजार, टेंपल ऑफ एमरल्ड बुद्ध ही खास पर्यटनस्थळे म्हणता येतील. येथील सफारी वर्ल्ड हे जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय काब्री शहरात आहे. ओनांग येथेील टीपा रिसॉर्ट हिरवाई आणि शांत वातावरणात आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत करते. मस्त समुद्रकिनारा, शॉपिंग, फूड प्लाझा, स्पा, कॉफीचा आस्वाद घेता येतो.

काब्री शहर हे दक्षिण थायलंडमधील मुख्य आकर्षण, अनेक सुंदर बेटांचा हा भाग असून त्यात प्रानाग, केव बीच, पोडा आयलंड, फीफी आयलंड यांची सैर करता येते.

Leave a Comment