एकापेक्षा एक पॉवरफुल बाईक बनविणारी अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हीडसनने भारतीय बाजारावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी २०१७ स्ट्रीट रॉड ७५० ही देखणी बाईक भारतात लाँच केली आहे. या बाईकची किंमत आहे ५.८६ लाख रूपये. तीन कलर ऑप्शनमध्ये ती उपलब्ध करून दिली गेली आहे.
हार्ले डेव्हीडसनची २०१७ स्ट्रीट रॉड ७५० लाँच
या बाईकचे डिझाईन नवे आहे. स्प्लीट सीट सेक्शन व मागे पाहण्यासाठी हँडलबारवर आरसे दिल्याने अन्य मोटरबाईकच्या तुलनेत ती वेगळी दिसते आहे. या बाईकला १३.५ इंची इंन्स्ट्रूमेंट क्लस्टर नवीन एलईडी लाईटसह दिला गेला आहे. बाईकचे वजन २२९ किलो आहे व प्रवास आरामदायी व्हावा यासाठी सस्पेन्शची चांगली व्यवस्था केली गेली आहे. बाईकला ७४९ सीसीचे जादा आऊटपुट देणारे रेल्व्होल्युशन ७५० व्ही ट्विन इंजिन, ६ स्पीड गियरबॉक्स, ड्युअल डिस्क ब्रेकसह अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीम दिली गेली आहे. यामुळे वेगात असतानाही बाईक व प्रवासी सुरक्षित राहण्यास मदत मिळणार आहे.