देशातील बड्या ऑटो कंपन्यातील एक असलेल्या महिंद्रा अॅन्ड महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय थार एसयूव्हीचे टॉय व्हर्जन सादर केले आहे. तीन ते सात वर्षांच्या मुलांसाठी असलेल्या या व्हर्जनची दिल्ली एक्स शो रूम प्राईज १७९०० रूपये आहे.
महिंद्राने आणली टॉय थार एसयूव्ही
ही टॉय थार एसयूव्ही पूर्णपणे इलेक्ट्रीक आहे. एकदा पूर्ण चार्ज केली की ती १ ते दीड तास चालते. तिचा टॉप स्पीड ताशी चार किलोमीटर आहे. या टॉय व्हर्जनसाठी सेफ्टीची कडेकोड व्यवस्था केली गेली आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी रिमोट कंट्रोल असून त्याच्या सहाय्याने पालक अथवा मोठी व्यक्ती कार कंट्रोल करू शकते. या कारसाठी दोन पिन व्हॉल्व चार्जर दिले गेले आहेत. चार्जिंगसाठी १० ते १२ तास लागतात. या एसयूव्हीला सीट बेल्ट, ब्रेक, अॅक्सिलरेटर पॅड, फ्रंट बॅक गिअर, यूएसबी रेडिओ अशी फिचर्स आहेत.
कंपनीचे अध्यक्ष आनंद महिद्रा यांनी ट्विट केले आहे की, महिंद्राने पहिली जीप १९६० मध्ये सादर केली तेव्हा तिची किंमत १२४२१ रूपये होती व आता टॉय व्हर्जन खर्या जीपपेक्षा सुद्धा महाग आहे.