स्वस्त झाला सोनी एक्सपिरिया एक्सझेड


विविध कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. लोकप्रिय मोबाईल कंपनी सोनीने आता आपल्या लोकप्रिय एक्सपिरिया एक्सझेड या स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात केली असून तब्बल १० हजार रुपयांची सूट या स्मार्टफोनवर देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची मोठी खासियत म्हणजे यामध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत.

सोनी कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक्सपिरिया एक्सझेड हा स्मार्टफोन लाँन्च केला होता. या स्मार्टफोनची लाँचिंग वेळी किंमत ५१,९९० रुपये होती. त्यानंतर या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर हा स्मार्टफोन ४९,९०० रुपये किंमतीला उपलब्ध होता. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन ३९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत ४१,९९० रुपये एवढी आहे. ऑनलॉईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनवरुन तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. दरम्यान, सोनीने किंमतीत दिलेली ही सूट कायमस्वरुपी असणार आहे की, तात्पुरती याबाबत कपंनीने काहीही स्पष्ट केलेले नाही.

Leave a Comment