मुंबई : मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच आर्थिक व्यवहार करता येणार आहे. अमेरिकेत सध्या गुगलने हे नवीन फिचर आणले असून ती सेवा लवकरच इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचे गूगलने सांगितले आहे.
जीमेलवरुन करता येणार आर्थिक व्यवहार
जीमेलने ‘फि-फ्री’ नावाचे फिचर आणले असून या अॅपने आता पैसे देखील पाठवता येणार आहेत. पैसे हे तुम्हाला तुमच्या बँकेतही जमा करता येणार आहेत. ई-मेल पाठण्या इतकेच हे अॅप सोपे आहे. जवळपास १ अब्ज लोक जगभरात गुगल वापरतात. त्यापैकी ७५ टक्के लोक हे मोबाईल वरुन जीमेल अॅक्सेस करतात. जीमेलने काही वर्षांपूर्वी ऑनलाईन व्यवहारांसाठी गुगल वॅलेट हे फिचर आणले होते. गुगलचे ७५ टक्के युजर्स मोबाईल वरुन जीमेल वापरतात. जगभरातील ८० टक्के युजर्स अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीम असलेले फोन वापरतात. त्यामुळे या नव्या फिचरचा जास्तीत जास्त लोकं वापर करतील अशी गुगलला अपेक्षा आहे.