फ्लॅगशीप स्मार्टफोन अगोदर नोकिया ७ व ८ येणार


एचएमडी ग्लेाबल कंपनीने नोकिया ७ व ८ हे दोन नवे स्मार्टफोन लवकरच म्हणजे मे किवा जूनमध्ये लाँच करण्याचे ठरविले असल्याचे समजते. नोकिया पॉवर युजर वेबसाईटवर या फोनसंदर्भातली माहिती दिली गेली आहे. मिडरेंज सेगमेंटमधले हे दोन्ही फोन असतील.

यात नोकिया ७ ला फुल एचडी डिस्प्ले तर नोकिया ८ ला क्वाड एचडी डिस्प्ले दिला जाईल असे संकेत दिले असून या दोन्ही फोनसाठी वेगळी मेटल बॉडी असेल. यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला असेल तसेच फिंगरप्रिट सेन्सरही असेल. दोन्ही फोनसाठी दमदार ड्युअल कॅमेरे असतील व नोकिया ८ साठी कार्ल झिस लेन्सचा वापर केला जाईल असेही समजते. हे दोन्ही फोन अँड्राईडवर चालतील. हे फोन बनविताना कंपनीने अॅपल, गुगल व सॅमसंगचे ट्रेंड फॉलो केले असल्याचेही समजते.

नोकियाचा फ्लॅगशीप स्मार्टफोन याच वर्षात येणार असून त्यात स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ६ जीबी रॅम, ड्युअल कॅमेरा असेल असे यापूर्वीच जाहीर झाले आहे. वरील दोन फोनच्या किंमतीचा खुलासा झालेला नाही मात्र फ्लॅगशीप फोनची किंमत ४३ हजाराच्या दरम्यान असेल असे समजते.

Leave a Comment