जगातील सर्वात मौल्यवान गणेश मूर्ती- किंमत ६०० कोटी


जगातील सर्वाधिक महाग गणेशमूर्ती म्हणून सुरत या हिरेनगरीत हिर्‍याच्या व्यवसायात असलेल्या कनुभाई आसोदिया यांच्या घरच्या गणेशमूर्तीची नोंद केली गेली आहे. १८२.३ कॅरटची ३६.५ वजनाची ही हिर्‍याची मूती स्वयंभू आहे. कनुभाई सांगतात १२ वर्षांपूर्वी बेल्जियम येथून त्यांच्याकडे आलेल्या कच्च्या हिर्‍यांमध्ये हा हिरा होता व निरखून पाहताना त्याला नैसर्गिकरित्याच गणेशाचा आकार आल्याचे त्यांना दिसले व त्यांनी हा हिरे गणेश आपल्या देवात ठेवला. आज हा गणेश हे त्यांचे आराध्य दैवत बनले आहे. आपोआप गणेशाचा आकार निर्माण झाला असेल तर त्याला स्वयंभू गणेश म्हटले जाते.

कनुभाई सांगतात या मूर्तीची किंमत करण्याचे कारण कधी पडलेच नाही कारण श्रद्धेची किंमत करता येत नाही. मात्र हिरे पारख्यांनी या हिर्‍याची किंमत ६०० कोटींपेक्षा अधिक केली आहे. या मूर्तीसाठी त्यांच्याकडे अनेक ऑफर्स आल्या पण ही मूर्ती विकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबियांबरोबरच बाहेरच्या लोकांनाही या गणेशाचे दर्शन घडवा असा आग्रह झाल्यानंतर मात्र त्यांनी ही मूर्ती कांही दिवस मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ठेवली होती. देश विदेशातून अनेक मान्यवर या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सुरतला येऊन गेल्याचेही कनुभाई सांगतात.

बाजारभावाप्रमाणे ही मूर्ती कोहिनूर हिर्‍यापेक्षाही महाग आहे. कोहिनूर हिरा १०५ कॅरेट वजनाचा आहे तर ही मूर्ती १८२.३ कॅरट वजनाची आहे.

Leave a Comment