एस्किमोंच्या इग्लूत राहायचेय? मनालीला चला.


लहानपणापासून भूगोलाच्या पुस्तकातून पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशात एस्किमो राहतात व त्यांची घरेही बर्फाची असतात. या घरांना इग्लू म्हणतात हे आपण शिकत आलो आहोत. त्यांच्या घराची वर्णने वाचून अनेकांना आपल्यालाही अशा घरात राहायला मिळेल का अशीही इच्छा झाली असेल. ही इच्छा आता बर्फाळ प्रदेशात न जाताही पुरी होणार आहे. अर्थात त्यासाठी हिमाचल प्रदेशातील मनालीला जावे लागेल. तसा मनालीला जाण्यायेण्याचा खर्च थोडा जास्त असला तरी या इग्लूत राहण्याचा खर्च मात्र सहज परवडणारा आहे.


विंटर स्पोर्टस तज्ञ म्हणून काम करणार्‍या विकासकुमार व ताशी दोर्जी या दोघा मित्रांनी असे दोन इग्लू कुल्लूच्या व्हॅलीत तयार केले आहेत. या दोघांनाही इग्लूत राहण्याची लहानपणापासून खूपच हौस होती व आपल्यासारख्याच शौकीनांसाठी त्यांनी असे इग्लू तयार केले आहेत. त्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून ते आणखीही इग्लू तयार करणार आहेत. या इग्लूसाठी बुकींग करताना पर्यटकांना पूर्ण पॅकेज दिले जाणार आहे. म्हणजे बर्फाच्या या घरात राहताना आवश्यक अशा स्लिपिंग बॅग्ज, गरम गाद्या, पिण्यासाठी गरम पाणी, तीन वेळा खाणे, थंडीपासून संरक्षणासाठी बॉनफायर म्हणजे आपली शेकोटी, वॉटरप्रूफ जॅकेट, पँटस, बूट अ्से सर्व सामान येथेच दिले जाईल.

या इग्लूत राहणार असाल तर कुटंब कबिला नेऊ नका कारण येथे दोन जणांचीच सोय होणार आहे. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत या बर्फाळ घराचा आनंद नक्की लुटता येईल.

Leave a Comment