मोदी सरकारसाठी ध्येय धोरणे ठरविणे व राज्याच्या विकास कार्यात समन्वय बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निती आयेागाने सल्लागार व वरीष्ठ सल्लागार पदांसाठी नेमणुका करण्यासाठीचे प्रपोजल सादर केले असून या प्रस्तावानुसार सध्या १० जणांची नेमणूक केली जाणार आहे.
निती आयोगाला हवेत मोदी सरकारसाठी सल्लागार
या प्रस्तावानुसार सरकार अनेक पातळ्यांवर सल्लागार नियुक्त करू शकणार आहे. या सल्लागारांचे काम मोदी सरकारची ध्येय धोरणे निश्चित करणे व विकास कामांसाठी सल्ला देणे असे असेल. या पदासाठी सध्याची मुदत पाच वर्षांची आहे मात्र ती ७ वर्षांपर्यंत वाढविता येणार आहे. सल्लागारांना महिना अडीच लाख तर वरीष्ठ सल्लागारांना महिना साडेतीन लाख रूपयांपर्यंत पगार दिला जाईल. त्यासाठी या क्षेत्रात सल्लागार पदासाठी किमान १३ वर्षे तर वरीष्ठ सल्लागार पदासाठी किमान १५ वर्षांचा अनुभव असावा अशी अपेक्षा आहे. या नियुक्त्यांसाठीचे नियम वेबसाईटवर प्रसिद्ध केले गेले आहेत. सध्या १० पदांसाठी भरती होणार असली तरी वर्कलोड पाहून आणखीही पदे भरली जातील असे समजते.