पुढच्या आठवड्यात परत येणार व्हॉट्सअॅपचे जुने ‘स्टेटस फिचर’


पुढच्या आठड्यापासून व्हॉट्सअॅप युजर्सना हवे असलेले जुने व्हॉट्स अॅप स्टेटस फिचर हे परत येणार असून व्हॉट्सअॅपने गेल्या महिन्यात ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ हे नवे फिचर आणले होते. लोकांचा या फिचरला नकारात्मक प्रतिसाद जास्त लाभला होता. युजर्सने हे फिचर आल्यापासूनच काही तासांतच ते काढून टाकण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर व्हॉट्स अॅपने जुने स्टेटस फिचर लवकरच परत आणणार असल्याचे सांगितले, पण आता पुढच्या आठवड्यापासूनच हे जुने फिचर परत येणार आहे. सुरूवातील अँड्राईड फोनवर हे जुने फिचर उपलब्ध होणार आहे नंतर आयफोनवर हे फिचर उपलब्ध होईल. त्यामुळे पूर्वीसारखेच व्हॉट्सअॅप युजर ‘Available’, ‘Busy’ यासारखे स्टेटस ठेवू शकतात. पूर्वीसारखे आपले स्टेटस ते कस्टमाईजही करू शकतात. जुन्या स्टेटसाठी एक वेगळा आयकॉन दिला जाणार आहे. पण याचबरोबर नवे फिचरही तसेच राहणार आहे. या फिचरचा वापर करून युजर्स पूर्वीसारखे फोटो, व्हिडिओ, जीआयएफ इमेज शेअर करू शकतात.

Leave a Comment