मुंबई – भारतात लेनोव्होच्या मोटोरोला कंपनीचे जी५ आणि जी५ प्लस या मॉडेल्सचे मोबाईल लाँच झाले असून मोटोच्या जी४ आणि जी४ प्लस या मॉडेल्सना भारतात ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यानंतर सर्वांनाच जी५ आणि जी५ प्लसची प्रतिक्षा होती. मोटोचे हे दोन्ही फोन केवळ फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. जी५ ची साधारण किंमत १५ हजार रुपये, तर जी५ प्लसची साधारण किंमत १७ हजार रुपये ऐवढी आहे.
मोटोचे जी५ आणि जी५ प्लसच्या ऑनलाईन विक्रीला सुरुवात
मोटो जी५ प्लसमध्ये ५ इंच आकाराची स्क्रिन, ७.० नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम, 2GHz Snapdragon 625 ऑक्टाकोर प्रोसेसर, २/३/४ जीबी रॅम व्हेरिएंट, १२ मेगापिक्सेल रिअर, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
मोटो जी५मध्ये ५ इंच आकाराची स्क्रिन, ७.० नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम, १.४ GHz Snapdragon ४३० प्रोसेसर, २/३ जीबी रॅम व्हेरिएंट, १३ मेगापिक्सेल रिअर, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.