होंडाने लॉन्च केली पहिली ‘मेड इन इंडिया’ डब्ल्यूआर-व्ही


नवी दिल्ली : आपली नवी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर कार डब्ल्यूआर-व्ही होंडा कार्स इंडिया लिमिटेडने लॉन्च केली आहे. राजस्थानच्या टपूकडा प्लान्टमध्ये होंडाच्या या नव्या गाडीची निर्मिती झाली असून कंपनीच्या म्हणण्यानुसार ही संपूर्णत: ‘मेड इन इंडिया’ अशी पहिली-वहिली कार आहे.

ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत कंपनीने तब्बल ६ कलर्समध्ये बाजारात आणली आहे. पेट्रोल इंजिन कारचे मायलेज १७.५ kmpl तर डिझेल व्हर्जनचे मायलेज २५.५ kmpl पर्यंत मिळू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. या गाडीत सेफ्टी फिचर्ससहीत अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम तसेच इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टमचे फिचर्स जोडले गेले आहेत. सोबतच ड्युएल एअरबॅग दिले गेले आहे. या कारची किंमत ७.७५ पासून ९.९९ लाख रुपयांपर्यंत (एक्सशोरुम) आहे.

Leave a Comment