नवी दिल्ली – आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील ९० टक्के रक्कम कर्मचा-यांना घर खरेदी करण्यासाठी काढता येणार आहे. ईपीएफ सदस्यांना केंद्र सरकारच्या या तरतुदीमुळे घर खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट भरण्यास मदत मिळणार आहे.
घर खरेदीसाठी पीएफमधील तुम्ही काढू शकता ९० टक्के रक्कम
केंद्र सरकार भविष्य निर्वाह निधीमध्ये काही नवीन नियम लागू करणार असल्यामुळे पीएफमध्ये खाते असणाऱ्या कर्मचा-यांना घर खरेदीसाठी पैसे भरता येणे शक्य होणार आहे. यासंदर्भात संसदेत केंद्रीय श्रम मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी माहिती दिली आहे.
या योजनेत दुरुस्ती केल्यानंतर नोकरी करणा-या कर्मचा-यांना स्वतःच्या पीएफ अकाऊंटवरून होम लोन घेता येणार आहे तसेच ईएमआयही भरता येणार आहे. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार १० ईपीएफओ सदस्यांना एकत्र येऊन एका को ऑ. सोसायटीची स्थापना करावी लागणार आहे. नव्या नियमांनुसार जर कोणी ईपीएफओचा सदस्य कोणत्याही गृहनिर्माण संस्थेचा सदस्य होत असेल तर त्याला फ्लॅटच्या खरेदीसाठी आपल्या पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येणार आहे.