सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ


नवी दिल्ली – मोदी सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे. २ टक्के महागाई भत्ता वाढविण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

काल कॅबिनेटची बैठक पार पडली या बैठकीत हा महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशभरातील ५० लाख कर्मचा-यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच महागाई भत्तात वाढ करण्यात आली होती. मात्र, महागाई भत्ता कमी असल्याचे कामगार संघटनांतर्फे म्हटले जात होते. त्यानंतर आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ १ जानेवारी २०१७ पासून लागू होईल.

महागाई भत्ता हा देशातील मूलभूत वस्तू आणि सेवा यांच्या वाढत्या किमतींच्या हिशोबात ठरतो. वर्षातील १२ महिन्यांच्या महागाई दराच्या सरासरीनुसार महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते. तीन ते चार महिन्याआधी महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती आणि आता पून्हा दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Leave a Comment