१२ महिन्यात सबवेच्या १०० नवीन शाखा!


नवी दिल्ली – पुढील १२ महिन्यांत १०० शाखा उघडण्याच्या योजनेवर सॅन्डविच रेस्टॉरन्ट चालविणारी ‘सबवे’ काम करत असून विस्तार वाढविण्यासाठी अनेक राज्यांत रेस्टॉरन्ट उघडण्याचा कंपनी विचार करत आहे. सध्या देशात कंपनीची ६०० पेक्षा अधिक रेस्टॉरन्ट आहेत.

या कंपनीच्या उत्पादनांना देशातील तरुणाईकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे देशातील अनेक राज्यांत विस्तार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. गुजरात आणि तामिळनाडूसारख्या राज्यांत अधिक विस्तार करण्यात येणार आहे. याचप्रमाणे नागपूर, रायपूर, ग्वाल्हेर, अजमेर यासरख्या शहरांतही नवीन दुकाने उघडण्यात येतील असे सबवे सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे क्षेत्रीय प्रमुख रंजीत तलवार यांनी म्हटले. ब्रॅन्डचा व्यवसाय १०० टक्के फ्रेन्चाईजीच्या आधारित करण्यात येणार आहे. यामध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत काही स्पष्ट करणे व्यवहारिक नाही असे त्यांनी स्पष्ट केले. कंपनी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ११२ देशांत कार्यरत आहे.

Leave a Comment