ब्लॅकबेरीचा ड्युअल सिमवाला मिडरेंज स्मार्टफोन औरोरा


कॅनेडियन मोबाईल उत्पादक कंपनी ब्लॅकबेरीने त्यांचा पहिला ड्युअलसिमचा मिडरेंज स्मार्टफोन औरोरा नावाने लाँच केला असून या फोनची किंमत आहे १७४०० रूपये. हा फोन सध्या इंडोनेशियात लाँच केला गेला आहे. इतक्या कमी किमतीतीतला ड्युअल सिमचा ब्लॅकबेरीचा हा फोन युजरसाठी आकर्षण बनले असल्याचा कंपनीचा दावा आहे. ब्लॅक, सिल्व्हर व गोल्ड रंगात तो उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनासाठी ५.५ इंची डिस्प्ले दिला गेला आहे. ४ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रोकार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, अॅड्राईड नगेट ७.० ओएस, १३ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ३००० एमएएच बॅटरी अशी त्याची फिचर्स आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी, एलटीई, जीपीएस, ब्ल्यूटूथ ४.०, वायफाय अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment