गेल्या ३६ वर्षातले सर्वात महागडे लग्न


गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये सर्वाधिक महागडे लग्न म्हणून १९८१ साली नोंद झालेल्या सौदी अरबचा राजपुत्र शेख मोहम्मद बिन झाएद यांच्या लग्नाचे रेकॉर्ड अद्यापी अबाधित राहिले असून त्यापूर्वी सर्वात महागडे लग्न म्हणून प्रिन्स चार्लस व डायना यांच्या विवाहाची नोंद झाली होती.

सौदीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झाएद अल नहयान हे यूएईच्या लष्कराचे उपसुप्रीम कमांडरही आहेत. त्यांचा विवाह १९८१ साली सलामा यांच्याबरोबर झाला असून त्यांना आता ९ मुले आहेत. इतिहासातले महागडे लग्न अशी या विवाहाची नोंद झाली. सात दिवस चाललेल्या या विवाहसोहळ्यासाठी त्या काळी ६ अब्ज रूपये खर्च केले गेले होते. २० हजार पाहुण्यांच्या सोयीसाठी कापडाचे सर्व सोयीनी युक्त असे प्रचंड स्टेडियम उभारले गेले होते. परंपरेप्रमाणे राजकुमार व त्यांच्या पत्नीने घोड्यावरून राज्याचा फेरफेटका मारून जनतेला गिफ्ट दिल्या होत्या. तसेच परंपरेप्रमाणे नवरीसाठी २० शाही उंटांवरून दागिने लादून आणून ते नवरीला भेट दिले गेले होते. यावेळी ५० अरबी व अफ्रिकन डान्स ट्रूप मनोरंजनासाठी आणले गेले होते तसेच पाहुण्यांच्या नेण्याआणण्यासाठी ३४ खासगी जेट विमाने तैनात होती.

शेख मोहम्मद बिन झाएद हे सौदीचे राष्ट्रपती शेख झाएद बिन सुल्तान अल नहयान यांचे तिसरे पुत्र असून झाएद बिन सुल्तान यांचा २००४ साली मृत्यू झाल्यानंतर ते राजकुमार बनले आहेत. आबुधाबी ही यूएईची राजधानी असून पंतप्रधान मोदी २०१५ साली यूएइअर्च्या दौर्‍यावर गेले होते.३० वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान सौदीच्या दौर्‍यावर गेले होते.

Leave a Comment