मुंबई – शेअर बाजारावर देशातील ५ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळत असून आज मंगळवारी होळीच्या सुट्टीनंतर उघडलेला शेअर बाजार तेजीत सुरू झाला.
शेअर बाजारावर ५ राज्यांच्या निवडणुकीचा सकारात्मक परिणाम
सुरुवातीच्या काही मिनिटांत निफ्टीने ९१२२ चा उच्चांक गाठला. त्यापुर्वी निफ्टीचा उच्चांक ९११९ एवढा होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास सेंसेक्स ४४० अंकांनी वधारत २९३८६ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर निफ्टीने १३६ अंकांची उचल घेत ९०७१ ची पातळी गाठली. निफ्टी सोबतच बँक निफ्टिनेही आपला उच्चांक गाठला. बँक निफ्टी १.६८ च्या पटीने वाढत २१०७६ पर्यंत पोहोचला आहे.
भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ११ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ४० पैशांनी वधारले आहे. शेअर बाजाराच्या तज्ज्ञांच्या मते देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या विजयामुळे असा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे.