भारताच्या सांस्कृतिक वारशाची व्हर्च्युअल सफर घरबसल्या करता येणार


विज्ञान आणितंत्रज्ञान मंत्रालयाने देशभरातील सर्व स्मारके थ्री डी तंत्रज्ञान व सायबर फिजिकल सिस्टीमखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्यामुळे कोणीही पर्यटक, प्रवासी, अभ्यासक घरबसल्या या सर्व सांस्कृतिक वारशाचे निरीक्षण करून त्याची डिटेल माहिती मिळवू शकणार आहेत. आर्किटेकचरल परंपरा प्रमोट करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

या सर्व स्मारकांचे थ्रीडी तंत्रज्ञानामुळे युजर घरबसल्या व्हर्च्युअल अनुभव घेऊ शकेल. त्यासाठी प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट देण्याची गरज राहणार नाही. दिल्लीतील सर्व स्मारकांचे या प्रकारे दर्शन घडविण्यासाठी थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून एखाद्या सराईत गाईडपेक्षाही यातील माहिती अधिक सखोल, खरी असेल असे विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रोफेसर आशुतोष शर्मा यांनी सांगितले. आयआयटी दिल्लीने आर्किटेकचरल वारसा पुनर्निर्माण तंत्र विकसित केले असून बनारसच्या गंगा घाटांपासून त्याची सुरवात केली जात असल्याचे शर्मा यांनी असोचेमने आयोजित केलेल्या आर्टफिशियल रोबोटिक्स परिषदेत ते बोलत होते.

Leave a Comment