ह्युंडाईची हायड्रोजन एसयूव्ही एका चार्जवर जाणार ८०५ किमी


जिनेव्हा येथे सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या कार शोमध्ये हयुंडाईने त्यांची नेक्स जनरेशन हायड्रोजन एसयूव्ही शोकेस केली आहे. ह्युंडाई एफई फ्युएल सेल कॉन्सेप्ट कार पेट्रोलवर नाही तर हायड्रोजनवर धावेल आणि एकदा तिचा टँक फुल केला की ८०५ किमीचे अंतर कोणत्याही अडथळ्याविना कापेल असा दावा कंपनीने केला आहे. शिवाय ही एसयूव्ही इकोफ्रेंडली असून तिच्यातून फक्त पाण्याचे उत्सर्जन केले जाईल त्यामुळे प्रदूषण होणार नाही.

कंपनीने ही कार वजनाला २० टक्के हलकी केली आहे. त्याचबरोबर १० टक्के जादा फ्यूएल इफिशिअन्ट व ३० टक्के जादा पॉवरफुल असलेल्या या एसयूव्हीला फ्यएल सिस्टीमशिवाय पोर्टेबल बॅटरी पॅक दिला गेला आहे. यामुळे इंधन संपले तरी कांही अंतर ती धावू शकणार आहे.या कारचे डिझाईन हयुंडाई ट्यूसन प्रमाणे आहे. ही एसयूव्ही २०१८ मध्ये लाँच केली जाणार आहे.

Leave a Comment