मुंबई – देशवासियांना होळीचे गिफ्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहे. आजपासून कोणतीही मर्यादा बचत खात्यामधून पैसे काढण्यासाठी राहणार नाही. तुम्ही आता बचत खात्यामधून कितीही रोकड काढू शकता. बचत खात्यातून रोख रक्कम काढण्यावर टाकलेली ५० हजारांची मर्यादा संपणार असल्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार पूर्ववत होणार आहेत.
आजपासून ‘लुट लो’ आरबीआयने हटवली पैसे काढण्याची मर्यादा
सर्वसामान्यांना होळीच्या सणाला चांगलाच दिलासा मिळला असून बचत खात्याबरोबरच एटीएममधूनही आता कितीही पैसे काढता येणार आहेत. चलन तुटवडा पूर्वरत झाल्यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत व सामान्य होतील. एवढेच नव्हे तर विविध खात्यांमधून रोख रक्कमेवरील सर्व प्रकारची मर्यादा संपुष्टात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काळा पैसा आणि बनावट नोटांवर आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द झाल्या होत्या.
यानंतर बँक आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर चलन तुटवड्यामुळे आरबीआयने अनेक मर्यादा घातल्या होता. परंतु चलन तुटवडा कमी झाल्याने वेळोवेळी या मर्यादा कमी करण्यात आल्या. करंट अकाऊंट, ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट अकाऊंटमधून रोकड काढण्याची मर्यादा ३१ जानेवारीला संपली होती. तर आजपासून बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा संपली आहे.