स्माईली इमोजीवाला अजगर


जगात अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक आकाराचे साप आहेत. विविध डिझाईन अंगावर असलेले सापही आपण पाहतो. मात्र अंगावर स्माईली इमोजी असलेला अजगर आता पाहता येणार आहे. जस्टीन कोबिलका याने ही कमाल प्रत्यक्षात उतरविली आहे. त्यासाठी त्याने आठ वर्षे सतत परिश्रम केले आहेत.

जस्टीनचे जॉर्जियातील टोकोया शहरात दुकान असून तो सापांची विक्री करतो. तो गेली काही वर्षे सापांना वेगळे रंग जन्मतःच यावेत यासाठी कांही प्रयोग करतो आहे. रिसेसिव्ह म्युटेशन असे या प्रक्रियेला म्हटले जाते. यामुळे सापाच्या डीएनएमध्ये बदल होतो व मादी व नर सापापेक्षा त्यांची पिले वेगळ्या रंगाची होतात. या प्रक्रियेचा वापर त्याने अजगरावर केला व पांढर्‍या रंगाचे व अंगावर स्माईली इमोजी असणारे अजगर त्यातून जन्मले आहे. त्याचे व्हिडीओ यू ट्यूबवर प्रसिद्ध झाले आहेत. असे वेगळ्या प्रकारचे साप जस्टीन भरभक्कम किंमतीना विकतो. या अजगरासाठीही त्याला पाच हजार डॉलर्स मिळतील असा अंदाज व्यकत केला जात आहे.

Leave a Comment