हिर्‍याच्या चुर्‍याने पेंट केलेली रोल्स रॉईस


जिनेव्हा येथे सुरू असलेल्या ऑटो शो २०१७ मध्ये लग्झरी कार मेकर रोल्स रॉईसने सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल अशी खास कार पेश केली आहे. या गाडीला १ हजार अस्सल हिर्‍याच्या चुर्‍याने पेंट केले गेले आहे. या कारची किंमत ६ कोटी रूपये सांगितली जात असून त्यात पेंटच्या खर्चाचा समावेश नाही असेही समजते.

ही कार कंपनीने ग्राहकाच्या खास मागणीनुसार तयार केली आहे. या ग्राहकाचे नांव जाहीर केले गेलेले नाही. हिरा हा मुळातच फार कडक असतो. त्यामुळे हिर्‍याचे बारीक चूर्ण करून त्यातून कार पेंट करणे हेच आव्हान होते. कंपनीने त्यासाठी दोन महिने अथक परिश्रम करून हे आव्हान पेलले. हिर्‍याच्या चुर्णाचे पेंटींग झाले तरी कारचा सरफेस गुळगुळीत रहावा यासाठी हँड पॉलिश केले गेले व त्यात लाखेचा पातळ थर त्यावर दिला गेला असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment