तीन वर्षात भारत जगातील मोठे कार मार्केट – सुझुकी कार्पोरेशन


सुझुकी मोटर कार्पोरेशनच्या म्हणण्यानुसार २०२० सालापर्यंत भारत जगातील तीन नंबरचे मोठ कार मार्केट बनलेले असेल व त्यात कंपनीचा हिस्साही मोठा असेल. जिनेव्हा येथे सुरू असलेल्या आटो शोमध्ये बोलताना सुझुकीचे कार्यकारी महानिबंधक किन्जो साईतो यांनी हे विधान केले आहे.

ते म्हणाले, भारतीय प्रवासी कार बाजारात सुझुकी मारूतीचा हिस्सा ५० टक्के आहे. २०२० पर्यंत आम्ही आमचे कार उत्पादन २० लाख युनिटसवर नेण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यासाठी गुजराथेतील उत्पादन प्रकल्प यापूर्वीच सुरू केला गेला आहे. भारताच्या वेगाने वाढत असलेल्या बाजारात आमचे योगदान मोठे असेल व जादा मागणी पुरविण्यासाठी आम्ही उत्पादन वाढ करतो आहोत. याच काळात कंपनी हिट ठरलेल्या माडेल्सबरोबरच नवी उत्पादनेही सादर करणार आहे.

Leave a Comment