कार चालविताना टी शर्ट देतील सूचना


वॉशिंग्टन विद्यापीठातील भारतीय इंजिनिअर्सनी असे टी शर्ट तयार केले आहेत जे वाहन चालविताना चालकाला रस्त्यात कांही अंतरावर असलेले खड्डे, वळण तसेच डावीकडे वळायचे की उजवीकडे याच्या सूचना देऊ शकतील. हे टीशर्ट रेडिओ एफएम प्रमाणे काम करतील. या टीशर्टमध्ये अनेक रेडिओ ट्रांन्समिटर लावले गेले आहेत. हे ट्रांन्समिटर रेडिओ सिग्नल कॅच करतील मात्र त्यातील जेवढे चालकासाठी उपयुक्त आहेत तेवढचे चालकापर्यंत पोहोचवितील. हे ट्रांन्समिटर २० मीटर पर्यंतच्या एरिया कव्हर करतील व त्यामुळे रस्त्यात असलेले धोके, वळणे यांच्या सूचना चालकाला अगोदरच मिळतील.

स्मार्ट सिटीमध्ये वाहन चालविताना असले टी शर्ट उपयुक्त ठरतील असाही दावा केला जात आहे. या मोहिमेचे मार्गदर्शक प्रो. श्याम गोलाकोटा या प्रकल्पाचा उद्देश सांगताना म्हणाले, बाहेरच्या वातावरणातील प्रत्येक छोटी वस्तू मग ते पोस्टर असेल, रस्त्यांच्या खुणा असतील त्या जाणून टीशर्टमधील ट्रांन्समिटर त्यानुसार स्मार्टफोन वा कार स्टिरिओकडे त्याची माहिती पाठवतील व त्याच्या माध्यमातून चालकाशी संवाद साधू शकतील.

Leave a Comment