आय १०चे प्रॉडक्शन बंद करणार ह्युंदाई


नवी दिल्ली : आपली लोकप्रिय आय १० कारचे प्रॉडक्शन भारतातून बंद करण्याचा निर्णय दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने घेतला आहे. आता प्रिमीयम आणि आधुनिक वाहनांवर कंपनी जास्त भर देणार असल्यानेच आय १०चे प्रॉडक्शन बंद करण्यात आले असल्याची देण्यात येत आहे.

छोट्या कारचे उत्पादन ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडने थांबवले आहे. आय१० ही कार कंपनीने २००७मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती. आत्तापर्यंत ह्युदांई आय १०या मॉडेलची १६ लाख ९५ हजार वाहनांची विक्री करण्यात आली आहे. याबाबत कंपनीच्या एका अधिका-याने सांगितले, आम्ही या मॉडेलचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आय १० ही कार ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. कंपनीकडून या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्यावर लक्ष देत आहोत.

Leave a Comment