एअरबसची उडती कार जिनेव्हा ऑटो शेामध्ये सादर


एअरबस या विमानांचे उत्पादन करणार्‍या कंपनीने त्यांची पहिलीच कार तीही उडती कार पॉप डॉट अप या नावाने जिनेव्हा येथे ७ मार्चपासून सुरू असलेल्या ऑटो शोमध्ये सादर केली आहे. ऑटो शो मध्ये जगभरातील वाहन कंपन्या त्यांची नवी मॉडेल्स नव्या कनसेप्टस सादर करत असतात त्या विमान कंपनीने कार सादर करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.

एअरबसने प्रथमच कसेप्ट कार मध्ये भाग घेतला असून या कारचे डिझाईन तयार करण्यासाठी इटलीच्या इटलडिझाईन या कंपनीशी करार केला आहे. ही हायब्रिड कॉनसेप्ट कार जमिनीवर चालेल तसेच आकाशात उडेल. दोन प्रवासी बसू शकतील एवढ्या आकाराची ही कार पॅसेंजर कॅप्सूलप्रमाणे आहे. या कारमुळे शहरात नवीन प्रवासी साधने उपलब्ध होतील तसेच नवीन ट्रान्स्पोर्टेशन सिस्टीम तयार करण्यासाठीही तिचा उपयोग होईल.

Leave a Comment