सावधान! रंग लागलेल्या नोटा बँका स्वीकारणार नाहीत


नवी दिल्ली – रंगपंचमी खेळताना तुमच्याजवळ असलेल्या नोटांना थोडासा जरी रंग लागला तर त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो. रविवारी होळी असून सोमवारी धुलीवंदन आहे. रंगपंचमी सण साजरा करताना अनेकदा चुकून खिशातील नोटांना वेगवेगळा रंग लागतो. अनेकदा रंग लागलेला असायचा तरीही त्या नोटा बँकेत स्वीकारण्यात येत होत्या. पण आता रंगपंचमी साजरी करत असताना तुमच्याकडील ५०० आणि २ हजारांच्या नोटांना थोडाही रंग लागला तर अशा नोटा बँका स्विकारणार नाही. फक्त रिझर्व्ह बँकेतच या नोटा जमा करता येतील.

रंग लागलेल्या नोटा बँकात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या क्लीन नोट पॉलिसींतर्गत स्वीकारल्या जाणार नाहीत. अनेकजण नोटेवर काही तरी लिहून त्याचा एखाद्या नोट बूक सारखा वापर करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ज्या नोटेवर पेनाने लिहिले असेल अशी नोट कोणत्याही बँकेने स्वीकारू नये असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

रिझर्व्ह बँकेने नोटा ‘पंच’ करणे तसेच नोटांना ‘स्टेपल्ड’ करणे यावर बंदी आणली आहे. नियमाचे उल्लंघन करुन नोट खराब केली तर ती बँकेत स्वीकारली जाणार नाही. तर रंग लागलेल्या नोटा बँकेने स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्या नोटा तुम्ही बँक खात्याऐवजी रिझर्व्ह बँकेत जमा करू शकता.

Leave a Comment